थोडक्यात
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार
महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही.
आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण राहुल नार्वेकरांविरोधात कोणत्याही पक्षाकडून दुसरा अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे.
राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही काल दुपारी 12 वाजेपर्यंत होती. मात्र आता एकच अर्ज असल्याने राहूल नार्वेकरांच्या नावाची आज घोषणा होणार असून राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत.