ताज्या बातम्या

Raigad Accident : रायगडच्या ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटली

रायगडच्या ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटून अपघात झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रायगडच्या ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटून अपघात झाला आहे. पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हीणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असून 55 जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव बचाव पथके, रुग्णवाहीका रवाना झाले आहेत. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. बस पुण्याहून हरीहरेश्र्वर येथे पर्यटकांना घेवून येत होती.

जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. रायगडच्या ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे