Railway Engine Model  Miniature akash kamble
Railway Engine Model Miniature akash kamble 
ताज्या बातम्या

Railway Engine Model Miniature : अंबरनाथच्या आकाशने साकारल्या रेल्वे इंजिनाच्या साकारल्या हुबेहूब प्रतिकृती

Published by : Pankaj Prabhakar Rane

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये राहणारा आकाश कांबळे हा तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून तो रेल्वेचा आणि रेल्वेच्या इंजिनचा मोठा चाहता आहे. अवघा दोन वर्षांचा असताना पासून तो रेल्वेने प्रवास करतोय. तिथूनच त्याच्या मनात रेल्वे विषयी आवड निर्माण झाली.

याच आवडीतून त्याने शाळेत असताना पासूनच रेल्वे इंजिन्सच्या प्रतिकृती साकारायला सुरुवात केली. आकाश हा मेकॅनिकल इंजिनियर असून तो मुंबई मोनोरेल मध्ये स्टेशन मॅनेजर सारख्या चांगल्या पदावर नोकरी करत होता. मात्र रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती साकारण्याचा छंदामुळे त्याने नोकरी सोडून पूर्णवेळ आपला छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने रेल्वेच्या डिझेल इंजिन्स पासून इलेक्ट्रिक इंजिन्स पर्यंत सर्व इंजिन्सच्या प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारल्या आहेत. इतकंच नव्हे, तर नुकतीच सुरू झालेली वंदे भारत ट्रेन आणि एसी लोकलचीही प्रतिकृती त्याने साकारली आहे.

टाकाऊ वस्तु आणि कार्डबोर्ड पेपरचा वापर करून तो ह्या प्रतिकृती साकारतो. त्याच्या या कलेची मध्य रेल्वेने सुद्धा दखल घेतली आहे. मध्य रेल्वेने नुकतीच त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची प्रतिकृती तयार करून घेतली. सध्या आकाश हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती साकारत असून त्याच्या कुटुंबीयांचा ही त्याच्या या कलेला आणि छंदाला पूर्णपणे पाठिंबा आहे.

Amol Kolhe : कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल