ताज्या बातम्या

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी रेल्वेचा 78 दिवसांचा ‘ब्लॉक’..रात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 78 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन्ही रेल्वे मार्गांवर रात्री किमान चार तास लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी रेल्वेचा 78 दिवसांचा ‘ब्लॉक’..

  • रात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार

  • मध्य रेल्वेने ‘महारेल’कडे 10 कोटी रुपयांची माग

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 78 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन्ही रेल्वे मार्गांवर रात्री किमान चार तास लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे रात्री घरी परतणाऱ्या नोकरदार मंडळींचे हाल होणार आहेत. एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम वेळीच पूर्ण करण्यासाठी दोन्ही रेल्वे प्रशासन ब्लॉकचे नियोजन करण्यास तयार झाले आहे. नियोजित वरळी-शिवडी उन्नत मार्ग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतून जात आहे.

त्यामुळे एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम तसेच नवीन डबलडेकर पुलाच्या बांधकामासाठी दोन्ही रेल्वे प्रशासनांची परवानगी आवश्यक होती. याबाबत ‘महारेल’ने केलेल्या पत्रव्यवहाराला दोन्ही प्रशासनांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकूण 78 ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली आहे. हे ब्लॉक रात्री किमान चार तास असतील. दोन्ही रेल्वे प्रशासन ब्लॉकचे नियोजन करणार आहेत. त्या 78 दिवसांमध्ये अनेक लोकल फेऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द आणि वाहतुकीत बदल केला जाणार आहे.

काही दिवसांत अधिक तासांचा ब्लॉक घेता येईल का, याचीदेखील चाचपणी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यापासून दादर, वरळी, लोअर परळ परिसरात रस्ते वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणी लवकर करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे 78 दिवसांच्या ब्लॉकचे शेड्यूल आखावे लागत आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले. एल्फिन्स्टन पूल मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत विस्तारलेला आहे. पुलाचा 72 मीटर भाग मध्य रेल्वेच्या हद्दीत, तर 62 मीटर भाग पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आहे.

दोन्ही भागांचे पाडकाम करण्यासाठी अलीकडेच झालेल्या बैठकीत रेल्वे प्रशासनांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार 78 दिवस रात्री चार तासांच्या ब्लॉकचे नियोजन केले जाईल. सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या हद्दीतून म्हणजेच पुलाच्या पूर्वेकडील भागाकडून पाडकाम सुरू केले जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुलाचे पाडकाम करण्यापूर्वी ‘वे लिव्ह चार्जेस’ म्हणून मध्य रेल्वेने ‘महारेल’कडे 10 कोटी रुपयांची मागणी केली होती, तर पश्चिम रेल्वेने तब्बल 59.14 कोटी रुपये मागितले. पश्चिम रेल्वेच्या अवाजवी रकमेमुळे पुलाचे पाडकाम रखडले. त्या शुल्काचा गुंता लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा