थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Railway) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. गुरुवारी कंपनीने तब्बल ५५० उड्डाणे रद्द केली.केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी इंडिगोची बुकींग केली आहे त्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. एअरपोर्टवर लोकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता इंडिगोच्या संकटात रेल्वेने मात्र दिलासा दिल्याचे पाहायला मिळत आहे. रद्द झालेली उड्डाणे आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. रेल्वेने एकूण 37 गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोचेस वाढवण्याचा निर्णय घेतला असून ज्यामुळे देशभरात 114 पेक्षा जास्त वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Summery
इंडिगोच्या संकटात रेल्वेचा दिलासा
रेल्वेनकडून एकूण 37 गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोचेस वाढवण्याचा निर्णय
देशभरात 114 पेक्षा जास्त वाढीव फेऱ्याही चालवणार