थोडक्यात
राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता
ऐन दिवाळीत पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता
पावसाचा जोर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Rain Alert)राज्यातील अनेक भागात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर राज्यात आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ऐन दिवाळीत पावसाची शक्यता असल्याने याचा फटका अनेकांना बसणार आहे.
हवामान विभागाकडून देण्यात (Maharashtra Rain Alert) आलेल्या माहितीनुसार, सध्या 1.5 किलोमीटर उंचीवर पश्चिम – मध्य अरब समुद्रात सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
19 ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे 15 ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघार घेणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातून मान्सून माघार घेत असल्याने काही दिवस आकाश ढगाळ राहणे आणि तुरळक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे.