ताज्या बातम्या

Heavy Rain : पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा

मागील अनेक दिवसांपासून पावसाने थांबायचं काही नावंच घेतलं नसल्याचं पाहायला मिळालं. नवरात्र, दसरा अन् आता दिवाळीतही जोरदार पाऊस बरसत आहे. पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार हे स्पष्ट आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • पुढील आठवड्यातही पाऊस बरसणार,

  • हवामान विभागाने काय अंदाज दिला?

  • कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण

मागील अनेक दिवसांपासून पावसाने थांबायचं काही नावंच घेतलं नसल्याचं पाहायला मिळालं. नवरात्र, दसरा अन् आता दिवाळीतही जोरदार पाऊस बरसत आहे. पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार हे स्पष्ट आहे. पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून पुणे वेधशाळेने यलो अलर्ट दिला आहे. आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने पुणे शहरासह जिल्हा आणि घाट विभागासाठी पुणे वेधशाळेने येलो अलर्ट दिला आहे. 48 तासांचा अलर्ट मुंबईसह उपनगरांना हवामान विभागाने पावसासह वादळी वाऱ्याचा दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही भागांत आज पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

मुंबईतील अरबी समुद्रातसह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलायं. तसेच बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतरण होणार असून समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आलायं.

बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होईल. मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 450 किमीवर आहे. त्याचे रूपांतर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर जात असले तरी सोमवारी पुन्हा ते वळण घेण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या मधल्या भागात बुधवारी सरकेल. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर बुधवार ते गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा