ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : यंदा दिवाळीत पावसाचं आगमन, 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

मराठवाड्यात या पावसाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. (Maharashtra Weather Update) मान्सून राज्यातून गेल्याचे सांगितले जात असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण

  • राज्यावर संकट! 15 जिल्ह्यांमध्ये अलर्ट,

  • पुढील 24 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा

मराठवाड्यात या पावसाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळाले. (Maharashtra Weather Update) मान्सून राज्यातून गेल्याचे सांगितले जात असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे, कोकण, मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. दसरा जाऊन दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाहीये. 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. अरबी समुद्रातील लक्षव्दीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 उंचीवर वारे वाहत आहे. केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टी निर्माण झाला. यामुळे राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळतंय.

मराठवाड्यातील काही भागात, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली या भागात पाऊस झाला. काल सायंकाली ठाणे जिल्हात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही बघायला मिळाले. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट देखील सुरू होता. भारतीय हवामान विभागाने 72 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत.

यामुळे हे स्पष्ट आहे की, राज्यातून मॉन्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कामयमच राहणार आहेत. 19 आँक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. या पावसाचा अधिक प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार आहे. किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. 15 जिल्हांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा