ताज्या बातम्या

Rainy Season Preparation : पावसाळ्यात घराबाहेर पडताना सोबत ठेवा 'या' वस्तू; नक्कीच होईल मदत

हवेत गारवा निर्माण करणाऱ्या पावसाचा आनंद घेतानाच पावळ्यात घराबाहेर पडत असल्यास काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Published by : Rashmi Mane

सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस पडत असताना नागरिकांना मात्र उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवेत गारवा निर्माण करणाऱ्या पावसाचा आनंद घेतानाच पावळ्यात घराबाहेर पडत असल्यास काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पावळ्यात कोणते कपडे घालावे, सोबत काय ठेवावं, आरोग्यासंबंधीत काय काळजी घ्यावी. हे आपण जाणून घेऊया...

खूप जास्त मुसळधार पाऊस असेल, तर प्रवास टाळावा. जर बाहेर पडणे आवश्यक असेल, तर रेनकोट, छत्री सोबत ठेवावी. योग्य कपडे परिधान करावे. सोबत फर्स्ट-एड किट आणि आपत्कालीन किट बाळगावी. पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊ शकतात. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा आणि सावधपणे वाहन चालवा.

'या' गोष्टींची घ्या काळजी

कपडे - पावसापासून बचाव करण्यासाठी वॉटरप्रूफ किंवा वॉटर-रेझिस्टंट कपडे वापरा.

सोबत घ्या - रेनकोट, छत्री, आणि वॉटरप्रूफ शूज वापरा.

आरोग्य - पावसाळ्यात आजारी पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे योग्य काळजी घ्या.

आहार - बाहेरचे अन्न खाताना स्वच्छतेला विशेष महत्त्व द्या.

सफर - उंच डोंगराळ भागात आणि वनक्षेत्रात फिरू नये, कारण पावसाळ्यात तेथे दरड कोसळण्याची शक्यता असते आणि विषारी वन्यजीव बाहेर पडतात.

हवामान - पावसाच्या अंदाजानुसार प्रवास करा.

सफाई - पावसाळ्यात घरी आणि ऑफिसमध्ये स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

आपत्कालीन किट - फर्स्ट-एड किट आणि आपत्कालीन किट सोबत ठेवा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा