वरळी येथील डोम सभागृहात आयोजित आवाज मराठीचा... विजयी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केले. त्यांनी हा केवळ मराठी माणसाचा मेळावा आहे, कोणत्याही पक्षाचा नाही, याचा पुनरोच्चार केला. ते म्हणाले की, खरंतर दोघांची भाषणं संपली, खरंतर आज मोर्चा निघाला पाहिजे होता. मराठी माणूस कसा एकवटतो, याच चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. मोर्च्याच्या चर्चेनं सरकारनं माघार घेतली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. पावसामुळे तो झाला नाही. बाहेर उभे आहेत, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मुलाखतीत म्हटलं होत, कोणत्या वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तब्बल २० वर्षानंतर मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते काम देवेंद्र फडणवीसला जमलंय. आपल्याकडे मूळ विषय सुरू बाजूला सोडून इतर गोष्टी सुरू होतात. माझ्या महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेनं पाहायचं नाही, हा प्रश्न गरजेचा नव्हता. कशासाठी हिंदी, कोणासाठी हिंदी, लहान मुलांवर जबरदस्ती लादत आहेत. तुमच्या हातात सत्ता असेल, ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असे राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला ठणकारवलं.