ताज्या बातम्या

Raj Thackeray: वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी केलं मनसैनिकांना 'हे' आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रसैनिकांना पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.

पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे. सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन.तेंव्हा भेटूया १४ जूनला. असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik On MNS Morcha : "मी देखील मोर्चात सहभागी होणार, मला अटक करुन दाखवा"; मंत्री प्रताप सरनाईक संतापले

Latest Marathi News Update live : मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना विचारला जाब?

Devendra Fadnavis On MNS Morcha : मिरारोडमध्ये मनसेचा मराठीसाठी मोर्चा, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, "...तर ते योग्य नाही"

Punit Balan : डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांना मदत नाही