औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्याला औरंगाबादकडे (Aurangabad) जाताना अपघात झाला आहे. राज ठाकरे उद्या यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. त्यासाठी ते पुण्याकडून (Pune) औरंगाबादकडे जात होते. राज ठाकरे हे कालच मुंबईतील (Mumbai) आपल्या निवासस्थानातून पुण्याकडे रवाना झाले होते. त्याठिकाणहून कार्यकर्त्यांसह ते आता आज औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. यादरम्यान, त्यांच्या ताफ्याला अपघात झाला असून, अपघातात काही गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याचं समजतंय. (Raj Thackeray Car Accident, Auranagabad)