आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात मनसेची बैठक पार पडली. पुण्यातील या बैठकीत पक्षातील नेते आणि शाखध्यक्ष यांची पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावरून राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि खडसावले देखील आहे. यावेळी काही शाखा अध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीवरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच दिलेले कार्य पूर्ण करत नसाल तर पुण्याची निवडणूक लढवणार नाही, असा गंभीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचसोबत दिलेले कार्य अपूर्ण ठेवणे, पक्ष संघटनेची बांधणी करण्यास हातभार न लावणे, मतदार याद्यांचे काम न करणे या सारख्या विविध विषयांवर काम होत नसेल तर पुण्यात निवडणूक लढवणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
पद घेऊन फक्त तुम्ही तुमच्या तुंबड्या भरणार असाल तर वेगळा मार्ग निवडा, राज ठाकरेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना खडसावलं आहे. जे पदाधिकारी दिलेले कार्य पूर्ण करत नसतील तर त्यांनी सोडून द्यावं अशा सूचना देखील या बैठकीतून राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.