ताज्या बातम्या

Raj Thackeray On Chhava: 'महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने छावा चित्रपट पाहिला पाहिजे'

राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. 14 फेब्रुवारीला रिलीज होणारा हा चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया.

Published by : Prachi Nate

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. छत्रपती संभाजी राजांचा 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वादात सापडलेला पाहायला मिळाला. छावा' चित्रपटातील नृत्यामध्ये 'छत्रपती संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखवले गेले आहेत. छावा चित्रपटातील हा वादग्रस्त भागावर राजकीयवर्तुळातून पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी छावा चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इतिहासाच्या पानात नाही, पण मनात त्यांनी लेझीम हातात घेतली असेल

राज ठाकरे म्हणाले की, परवा संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट करणारे लक्ष्मण आले होते, उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे... छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहे, तर संभाजी राजे हे आमचे बलिदान आहेत... अमेय खोपकर यांनी सांगितलं की, त्यांना मला भेटायचं आहे... त्या चित्रपटात महाराज लेझीम खेळत आहेत असं काहीतरी दृश्य आहे... संभाजी महाराज यांनी लेझीम हातात सुद्धा घेतली असेल असं इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तरी त्यांनी लेझीम हातात घेतली असेल...

चित्रपटामुळे सगळ्यांच्याच भावना उफाळून आल्या आहेत

पुढे राज ठाकरे म्हणाले की, हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागला आहे, सगळ्यांच्याच भावना उफाळून यायला लागले आहेत... त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, औरंगजेबाने केलेला अत्याचार डोक्यात ठेवून लोक चित्रपट पाहायला जातील. म्हणून, मी त्यांना बोललो की हे दृश्य चित्रपटातून काढून टाका... महात्मा गांधींवर चित्रपट बनवला असता... तर आपण असं डोक्यात ठेवून गेलो असतो की, महात्मा गांधी आंदोलन करत आहेत... पण ते दांडिया खेळताना दिसले असते तर कसं वाटलं असतं... महात्मा गांधींच्या हातात एकच दांडी आहे ते कसे खेळणार... आपण असं गृहित करतो ते चित्रपटांमध्ये पाहायचा प्रयत्न करतो, असं म्हणत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात