Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

Video : राज ठाकरे महाआरतीत सहभागी, मात्र पुर्णवेळ होते शांत?

Hanuman Jayanti 2022 : मनसेकडून आज पुण्यात महाआरती आणि हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Published by : Sudhir Kakde

पुणे : मनसेकडून आज पुण्यात (Pune) महाआरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावेळी राज ठाकरे स्वत: या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र सर्व लोक आरती म्हणत असताना राज ठाकरे मात्र शांत उभे राहून टाळ्या वाजवत उभी असल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे (Raj Thackeray) आरती का म्हटले नसेल असा सवाल उपस्थित केला जातोय. (Raj Thackeray in Pune for Hanuman Jayanti Maha Aarti)

मनसेकडून सध्या राज्यभरात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. विशेषत: पुण्यात यानिमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राज ठाकरेंच्या हस्ते सुरुवातील हनुमानाची आरती करण्यात आली. त्यानंतर बाहेर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व उपस्थितांनी मोठ्या उत्साहात हनुमानाची आरती म्हटली मात्र राज ठाकरे शांत उभे असल्याचं पाहायला मिळालं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."