महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केल आहे.
यामध्येच राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, मी आजपर्यंत ऐकलं होते राखेमधून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमधून राखेतून गुंड तयार होतात. संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणीही असता.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, विषय होता, पैशांचा, खंडणीचा, आपण लेबल काय लावलं? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय. पण तुम्हाला गुंतवलंय जातं आहे. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात, त्याच्यातच गुंतून राहा. असे राज ठाकरे म्हणाले.