ताज्या बातम्या

Operation Sindoor : Raj Thackeray : “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "पहलगामला जो हल्ला झाला. ज्यांनी हल्ला केल्या त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे. अत्यंत कठोर असा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसतं. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे. त्याला काय बरबाद करणार तुम्ही."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, " ज्या अतिरेकींनी हल्ला केलाय ते अतिरेकी तुम्हाला अजून सापडले नाही आहेत. जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केला आहे. त्यांना शोधून काढणं आणि त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मॉक ड्रिल करण्यापेक्षा कोबिंग ऑपरेशन करा. नाव आणि देऊन भावनांचा विषय येत नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ