महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. मिरा रोडमध्ये 8 जुलै रोजी मोर्चा निघाला. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी मिरा रोडमध्ये उपस्थित राहून जनतेला संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी अमराठी लोकांवर निशाणा साधला आहे.
तसेच राज ठाकरे यांनी हिंदीवरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, महाराष्ट्रासाठी मराठी सक्तीची. इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली. कोण दबाव टाकतं तुमच्यावर. केंद्राचं हे पूर्वीपासूनचं आहे. काँग्रेस असल्यापासूनचं हे सगळं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्याचा प्रचंड मोठा लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता.
नंतर राज ठाकरे म्हणाले की, "ज्यावेळी मुंबईसाठी महाराष्ट्रात आंदोलन झालं. तेव्हा मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारलं. अनेक वर्षापासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे. सहज होत नाही. हे चाचपडून पाहत आहे. हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतो का. मराठी माणूस पेटतोय का. तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पुढची पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची", असा डाव असल्याचेदेखील राज ठाकरे म्हणाले.
नंतर दुबेबद्दल राज ठाकरे म्हणाले की, "भाजपचा कोण तरी दुबे नावाचा खासदार काय बोलला. पटक पटक के मारेंगे म्हणाला. झाली का त्याच्यावर केस. हिंदी चॅनलने चालवलं का. काही नाही. कसे असतात ते पाहा. तु आम्हाला पटक पटक के मारणार. दुबे जर मुंबईत आला तर त्याला डुबा डुबा कर मारेंगे', असं म्हणत कडक इशारादेखील दिला आहे.