MNS Melava in Mumbai on 13 octomber 2024 MNS Melava in Mumbai on 13 octomber 2024
ताज्या बातम्या

MNS Melava: मनसे गटाध्यक्षांचा 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा

आज सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा होत आहे तर दुसरीकडे मनसेच्या गटाध्यक्षांचा येत्या 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गोरेगाव येथील नेस्को (NESCEO) ग्राउंड येथे हा मेळावा पार पडणार आहे.

मनसेच्या या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election 2024) मनसे कंबर कसून कामाला लागली आहे. आज सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा होत आहे तर दुसरीकडे मनसेच्या गटाध्यक्षांचा येत्या 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

विधानसभेसाठी सध्या तरी मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागात पोहचण्याचा प्रयत्न करून मनसेकडून दौरे, बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 6 ऑक्टोबरला नाशिकला होते तर 7 ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर आहेत. तर येत्या रविवारी मुंबईमध्ये गटाध्यक्षांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप