ताज्या बातम्या

Raj Thackeray Live : मशिदीच्या बाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार

Jitendra Zavar

राज ठाकरे यांनी १ तास २ मिनिटे केलेल्या भाषणात आज चौफेर फटकेबाजी केली. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी घेरले. शिवसेनेचे संजय राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे राज यांच्या टीकेचे लक्ष्य होते. माझ्या भात्यातील पुढचा बाण काढला नाही, तो काढायला लाऊ नका.

पवार साहेब नास्तिक आहे. ते धर्म मानत नाही. कधी त्यांचा मंदिरातील फोटो पाहिला का? घराघरात बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज पोहचले. परंतु आम्हाला इतिहास बघायचा नाही तर पुस्तक कोणत्या जातीच्या व्यक्तीने लिहिले. ते पाहिले जात आहे. काय पवार साहेब काय चालले आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीने जातीपाती गाडून टाकल्या पाहिजे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी ते जातीपातीचे राजकारण करत आहात. जातीपातीच्या चिखलातून बाहेर या.

शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचे नाव घेत नाही. त्यांचे नाव घेतले तर मते जातील ही भीती त्यांना असते. ते नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. पण त्यांच्या आधी महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तरी त्यांचे नाव पवार साहेब का घेत नाही.

संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे.

जेथून जितेंद्र आव्हाड निवडून येतो, त्या ठिकाणी मुंब्य्रात अतिरेकी का सापडतात ? या देशावर प्रेम करणारा मुसलमान भरडला जात आहे.

महाराष्ट्राचे स्वास्थ आम्हाला बिघडवयाचे नाही. आज १२ तारीख आहे. आता ३ मे पर्यंत मशिदीचे सर्व भोंगे उतरवले गेले पाहिजे. गृहखात्याने सर्व मौलवींना बोलवून हे सांगून ठेवावे. ३ मे नंतर जर भोंगे उतरले नाही तर देशात जेथे-जेथे मशिदी आहेत, त्याठिकाणी हनुमान चालीसा लावणारच. कोणताही धर्म इतरांना त्रास देत नाही.

अनेक देशांमध्ये स्पिकरवर बंदी आहे. त्या ठिकाणी काय बोलू शकतो. ३६५ दिवस ते आम्ही कशासाठी ऐकायचं.शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचे नाव घेत नाही. त्यांचे नाव घेतले तर मते जातील ही भीती त्यांना असते. ते नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. पण त्यांच्या आधी महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तरी त्यांचे नाव पवार साहेब का घेत नाही.

वातावरण आम्ही बिघडवत नाही. तुमच्या त्या भोंग्यांमुळे विद्यार्थी, रुग्ण सर्वांना त्रास होतो. प्रार्थना घरात करा. धर्म घरात जपा. भोंगे उतरवणार नसतील तर मशिदीच्या बाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार.

जयंत पाटील यांची नक्कल काढून राज ठाकरे यांनी त्यांना उत्तर दिले. मनसे म्हणे विझलेला पक्ष आहे… असं म्हणााऱ्या जंतराव.. हा विझलेला पक्ष नाही, विझवणाऱ्यांचा पक्ष आहे.

सकाळचा शपथविधी झाला. त्यानंतर शरद पवारांनी आवाज काढला. त्यानंतर तीन, चार महिने अजित पवारांना ऐकू येत नव्हते. अजित पवारांच्या माहितीसाठी तीन व्हिडिओ आणले.

अजित पवारांकडे रेड पडते पण शरद पवारांकडे का नाही. यानंतरही पवार आणि मोदींचे संबंध मधूर कसे?

देशात समान नागरी कायदा आणा आणि देशातील लोकसंख्येवर नियंत्रण येईल, या विषयी कायदा आणा, ही मागणी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांकडे आहे.

मला ईडीची नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयात गेलो. परंतु पवारसाहेबांना नुसती चाहूल लागली की ईडीची नोटीस येणार तर किती नाटके केली.

7.41 मिनिटांनी राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात. माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळाले. परंतु पवार साहेबांचा घरी हल्ला होणार हे पोलिसांना कळाले नाही ही आहे राज्याची गुप्तचर यंत्रणा.

नाशिकमधील मनसे पदाधिकारी सलीम शेख म्हणतात, माझा डिएनए फुले, आंबेडकर आणि पैगबंरांचा

https://youtu.be/dkni7p3WE_wसंदीप देशपांडे यांची शिवसेनेवर टीका, निवडणुकीपुर्वी एकाशी युती, निवडणुकीनंतर दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलो, हा तुमचा इतिहास. शिवसेनेचा प्रवास वसंत सेना ते शरद सेना.

मनसे पुणे शहरध्यक्ष वसंत मोरे मनसेवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होते. त्यांनी सभेत सांगितले की, अनेक पक्षांनी आपणार ऑफर दिल्यात.

राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले आहे. काही वेळातच मनसेची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर