Gunaratna Sadavarte : "...तर त्याला जबाबदार तुम्हीच"; मनसे कार्यकर्त्याची ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धमकी, Audio clip viral Gunaratna Sadavarte : "...तर त्याला जबाबदार तुम्हीच"; मनसे कार्यकर्त्याची ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धमकी, Audio clip viral
ताज्या बातम्या

Gunaratna Sadavarte : "...तर त्याला जबाबदार तुम्हीच"; मनसे कार्यकर्त्याची ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धमकी, Audio clip viral

मनसे कार्यकर्त्याची धमकी: सदावर्तेंना फोनवर धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्याने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर ही धमकी दिल्याचे समजते.

सदावर्तेंना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याची धमकी या कार्यकर्त्यांनी दिली आहे. फोनवरून देण्यात आलेल्या या धमकीचं ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी करत नाही. संबंधित कार्यकर्त्याने सदावर्तेंना जाब विचारत म्हटले की, “राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही चुकीचं विधान कसं करू शकता?” सदावर्तेंनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यावर, कार्यकर्त्याने त्यांना थेट धमकी दिली . “उद्या तुमच्या घरावर हल्ला झाला, तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल.” या प्रकारामुळे राजकीय व कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पुढील चौकशी अपेक्षित आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर