Raj Thackeray Corona Positive Team Lokshahi
ताज्या बातम्या

Raj Thackeray Corona Positive: राज ठाकरेंना कोरोनाची लागण

उद्या होणार असलेली राज यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

Published by : Vikrant Shinde

मुंंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief raj Thackeray) यांच्या पायावर उद्या शस्त्रक्रिया होणार होती. दरम्यान, याच शस्त्रक्रियेच्या पार्श्वभुमीवर राज आज सायंकाळी लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यांचे रीपोर्ट पॉझिटीव्ह आले असल्या कारणाने ते पुन्हा आपल्या राहत्या घरी आले आहेत.

राज यांचा अयोध्या दौरा स्थगित:

राज ठाकरे यांनी 5 जून रोजी होणार असलेला अयोध्या दौरा स्थगित करताना याच शस्त्रक्रियेचे कारण दिले होते तर सोबतच राज यांना अयोध्येत पोहोचवणे हा एक कट असल्याचाही उल्लेख केला होता. त्यानंतर आता ही शस्त्रक्रियाही स्थगित झाली आहे.

आता पुढील उपचार:

राज ठाकरे हे कोरोनाचे उपचार आपल्या राहत्या घरीच घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा