वरळी येथील डोम सभागृहात आयोजित 'आवाज मराठीचा...' विजयी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केले. त्यांनी हा केवळ मराठी माणसाचा मेळावा आहे, कोणत्याही पक्षाचा नाही, याचा पुनरोच्चार केला. त्यांनी मराठी माणसांच्या एकत्र येण्याबाबत सांगितले की, "आज सगळे मराठी म्हणून एकत्र आले आहेत. सत्ताधाऱ्यांच पुढचं राजकारण उद्या तुम्हाला जातीमध्ये अडकवणार. ते जातीच कार्ड खेळणार. तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीच राजकारण करणार."
हेही वाचा