ताज्या बातम्या

'....सरकारचा मूर्खपणा' मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

Published by : shweta walge

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पळस्पे येथून मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतून ही पदयात्रा गेली. समारोप कोलाडमध्ये झाला. यावेळी सरकारला जाग येण्यासाठी ही पदयात्रा असल्याचं राज ठाकरे यांनी कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी भाषणावेळी म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा मला माहित नाही पण हायवे वर पेव्हार ब्लॉक लावले आहेत. जगात कुठेही जा पेव्हार ब्लॉक हे फुटपाथ वर लावतात.

आपले धोरण आहे की पहिल्यांदा हात जोडून जा नंतर हात सोडून जा. सर्वांचे आभार मानायला मी आलो आहे. माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर मी देखील चाललो असतो. काय चाळन झाली आहे रस्त्यांची याचा तुम्हाला राग कसा येत नाही. तीच माणसे तुम्ही निवडून देतात. त्यात किती माणसे गेली असतील.

नितीन गडकरी यांनी केला बाळासाहेब यांचा आशीर्वाद घेऊन ज्या महाराष्ट्राने हा आदर्श दिला महाराष्ट्रात असा रस्ता का?सोपे उत्तर आहे कारण तुम्हाला राग येत नाही. आपण त्याच त्याच लोकांना निवडून आणतो, असं ते म्हणाले.

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नसतं. ज्यांनी मनसे कार्यकर्त्यांना त्रास दिला त्यांना रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असा इशारा देखिल राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित