ताज्या बातम्या

'तुम्हाला अधिकार कोणी दिला?' मराठा आरक्षण विधेयकावरुन राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Published by : shweta walge

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का? असा सवाल देखिल उपस्थित केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, आनंद आहे पण मराठा समाजाने जागृत राहावं. तोंडावर पान पुसण्याचं काम चालू आहे. हा केंद्रीय विषय आहे. सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद साजरा करत आहेत पण राज्य सरकारला याचा अधिकार आहे का?

राज्यात एखाद्या जातीबद्दल असं करणं मला कळत नाही. इतर मोठे विषय आहेत यांच्याकडे कुणाचं लक्षच नाही. लोकांसोबत आमची चर्चा झाली काय झालं ते नाही सांगू शकत. लोकांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत कोण बोलत नाही. मला मनोज जरंगे पाटीलवर बोलायचं नाही.

राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा

दहावीच्या परीक्षेचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...