ताज्या बातम्या

Uddhav Thackeray & Raj Thackeray : मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र? ठाकरे बंधूमिलनावर शिंदेसेनेकडून प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळण. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर शिंदेसेनेकडून प्रतिक्रिया

Published by : Prachi Nate

गेल्या अनेक दिवसांच राजकारण पाहता राजकारणातत काहीही होऊ शकत. राज ठाकरे यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंसोबतच्या एकत्र येण्याच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळचं वळण पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. त्यामुळे आता समोर येत असलेल्या वक्तव्यावर आगामी काळात येणार राजकारण कसं असेल याकडे सर्वांच लक्ष आहे. याचपार्श्वभूमिवर शिंदेंच्या सेनेकडून यावर प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.

उदय सामंत काय म्हणाले?

"मनसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो, आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत. त्यामुळे राज ठाकरे यांनी काय करावा हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं. या भेटीदरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांना सांगितला आहे. राज ठाकरे त्यांच्या मुलाखतीत असं का म्हणाले हे राज ठाकरे सांगू शकतात".

भरत गोगावले काय म्हणाले?

"राजकारणात कधी काही घडेल हे तुम्ही आम्ही कोणी काही सांगू शकत नाही. सकाळचा माणूस संध्यकाळी कुठ असेल ते सांगू शकत नाही. राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं ती चांगली बाब आहे. दोघे भाऊ-भाऊ आहेत त्यात आमचं काही म्हणणं नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात आमच्या सोबत होते. शिवसेना हाताळणं हे त्यांच्या दोघा भावांचा प्रश्न आहे. आम्ही होतो ते वेगळे होतो. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतः हिम्मत दाखवली आणि त्याची किंमत त्यांनी मोजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडून महाराष्ट्राला दाखवून दिलं पुन्हा सत्ता आणण्यासाठी जो काय सिंहाचा वाटा उचलला होता ते सर्व जनतेने पाहिला आहे. महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या सर्व महाराष्ट्र धर्मामध्ये आम्ही युतीची लोक आहोत. त्यांना महायुतीच्या सोबत यायचं असेल तर ठीक आहे तर दोन भावांना एकत्र काय करायचं असेल तर करू द्या".

संजय शिरसाट काय म्हणाले?

"राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली ती सर्व व्यापी भूमिका मांडली आहे. ते उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलले त्याला महत्व आहे. राज ठाकरे यांना यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती आहे, त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत यायचे असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती सोडावी लागेल. ते सोडतील का? ही युती होणार नाही हे 100 % सांगतो".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा