आजचा दिवस केवळ एका राजकीय कार्यक्रमाचा नव्हे, तर मराठी अस्मितेचा सोहळा ठरत आहे. वरळी होम परिसरात आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नागरिक जमू लागले आहेत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपतेय, आणि राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं प्रत्यक्षात पाहण्याची घटिका आता समीप आली आहे.
परिसरात मराठमोळ्या वेशभूषेत नागरिकांनी हजेरी लावली आहे. कुणी फेटा बांधला आहे, कुणी पारंपरिक नऊवारी नेसली आहे, तर कुणी लहान मुलांना देखील मराठी पोशाखात आणलं आहे. यावेळी एका वडिलांनी त्यांच्या छोट्या मुलीला पारंपरिक मराठी वेशात घेऊन येताना सांगितलं, “आजचं वातावरणच पूर्णपणे मराठमोळं झालं आहे. आणि राज साहेब व उद्धव साहेब एकत्र येत आहेत, ही आमच्यासाठी फक्त अभिमानाची बाब नाही, तर आमच्या मराठी अस्मितेचा माज आहे.”
हजारोंच्या संख्येने जमलेली जनता आज फक्त एक गोष्ट सांगतेय — ‘आम्ही मराठी असल्याचा अभिमान बाळगतो, आणि तो जपण्याची जबाबदारी देखील आमची आहे.’ या वातावरणात एक अनोखा क्षण घडला. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका मराठमोळ्या पोशाखातील चिमुकलीने अगदी निरागस पण ठाम शब्दांत भावना व्यक्त केल्या. सदावर्तेंवर निशाणा साधत ती म्हणाली, "ये सदावर्ते, भाजपाचा कुत्रा, आता भू भू कर!" राज साहेब थँक्यू.... आय लव यू!!!तिच्या निष्पाप पण ठाम बोलण्यातून जनतेच्या मनातील भावना सहज उमटली.
आजचा हा क्षण केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मंचावर येण्याने अनेक वर्षांची दरी मिटेल अशी आशा मराठी मनात निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा सोहळा राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहील, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.