मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दिप या निवासस्थानी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यात दोन तास चर्चा झाली. आज माजी आमदार राजन साळवी हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करत आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश करण्यात येईल. याचपार्श्वभूमिवर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, "आत्ताची भेट ही मी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी मी सांगितली होती. काही आमदार UBT सोडून शिवसेनेचा धनुष्यबान हातात घेतील, त्याकरिता बैठक होती. आमच्य जिल्ह्यातील राजापूर लांजा साखरबा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती. किरण भैया राजन साळवी आणि मी स्वतः या बैठकीला होतो".
पुढे उदय सामंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय राजन साळवी यांनी घेतला आहे, दुपारी ठाण्यातील टेंभी नाक्याजवळ ते पक्षप्रवेश करणार आहेत. याबाबत आमची चर्चा झाली, अशी स्पष्ट प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे".