थोडक्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
22 जूनपासून किल्ला बंद ठेवण्यात आला होता.
र्यटकांनी मोठ्या संख्येने येथे भेट देण्यास सुरुवात केली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असलेल्या या किल्ल्याला पाहण्यासाठी आजवर पर्यटकांना थांबावे लागले होते.
22 जूनपासून किल्ला बंद ठेवण्यात आला होता. किल्ल्यातील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याभोवती असलेला पदपथ खचल्याने त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज निर्माण झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कालावधीत पदपथाची दुरुस्ती तसेच इतर देखभालीची कामे करण्यात आली.
दरम्यान पावसाळ्यात सिंधुदुर्ग किल्ला बंद असल्याने, मालवणकरांसह पर्यटकांसाठी राजकोट किल्ला हे एकमेव आकर्षण ठरत होते. मात्र दुरुस्तीमुळे हे ठिकाणही बंद असल्याने पर्यटक निराश झाले होते. आता किल्ला पुन्हा खुला होताच पर्यटकांनी मोठ्या संख्येने येथे भेट देण्यास सुरुवात केली आहे. किल्ला परिसर पुन्हा गजबजलेला दिसत असून स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटक दोघांसाठीही ही आनंदाची बातमी ठरली आहे.