ताज्या बातम्या

'निती गलत हो सकती है नियत नही'; राजनाथ सिंहांनी नेहरुंबद्दल केलेलं वक्तव्य ठरतंय चर्चेचं कारण

Published by : Sudhir Kakde

कारगिल विजय दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) रविवारी जम्मूमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी 1999 च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या हौतात्म्याचं स्मरण केलं. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "मी त्या सर्व सैनिकांचं स्मरण करतो ज्यांनी देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. 1999 च्या युद्धात ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व जवानांना मी सलाम करतो."

नेहरूंबद्दल राजनाथ सिंह काय म्हणाले?

या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. 1962 च्या युद्धाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, '1962 मध्ये चीनने लडाखमध्ये आमच्या जमिनीवर कब्जा केला. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या हेतूंमध्ये कोणताही दोष असू शकत नाही, मात्र धोरण चुकू शकतात. मात्र, आता भारत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.

पाक व्याप्त काश्मीरबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले, आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होतोय. भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं. 1962 मध्ये आमचं जे नुकसान झालं त्याची आम्हाला जाणीव आहे. ते नुकसान आजपर्यंत भरून निघालेलं नाही. पण आता देश मजबूत आहे. पीओकेबद्दल बोलताना ते म्हणाले, यासंदर्भात भारताच्या संसदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. हा भाग भारताचा होता आणि भारताचाच राहील. बाबा अमरनाथ आपल्यासोबत आहेत आणि आई शारदा सीमेपलीकडे आहे असं होऊ शकत नाही असं राजनाथ सिंह म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...