ताज्या बातम्या

राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी

बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही घातली बंदी

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश करण्यात आला असून रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

बारसू प्रकल्पास शेतक-यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतक-यांच्यावर लाठीहल्ले , अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतक-यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी ऊपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे.

दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून यामध्ये त्यांनी सोशल मिडीयावरही पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे.अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्याठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायर प्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याची टिका राजू शेटटी यांनी केली आहे.

दरम्यान काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांचेवतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांचेवतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचो कारण दाखवित सदर नोटीस लागू करण्यात आलेली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा