ताज्या बातम्या

Raju Shetti : सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलीटर 7 रुपये अनुदान द्यावं

सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलीटर 7 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलीटर 7 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये दररोज एक कोटी वीस लाख लीटर गायीच्या दुधाचे उत्पादन होतं पण प्रत्यक्षामध्ये जर वापर बघितला तर पॅकिंग मधलं दूध आणि इतर पदार्थासाठी वापरले जाणाऱ्या दुधामध्ये 40 लाख लिटर दूध अतिरिक्त होते. या अतिरिक्त होणाऱ्या दूधापासून पावडर आणि बटर तयार होत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बटर आणि दूध पावडरचे स्टॉक पडून आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातले आणि देशांतर्गंत बाजारातले पावडरचे भाव एकदम खाली आलेले आहेत. त्यामुळे 40 लाख हे अतिरिक्त होणारे दूध आहे त्या दूधाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दूध पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी दूधाचा दर हा 25 - 26 रुपयांपर्यंत खाली आणलेला आहे. त्याचा एकूणच फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. आज 30 रुपये दूधाला भाव मिळाला तरीसुद्धा दूध उत्पादक 5 - 6 रुपये तोट्यामध्ये जातो. मग 25 - 26 रुपयाला दूध विकून उत्पादकाच्या हातामध्ये पडणारच काय?

यासोबतच ते म्हणाले की, बारामतीमध्ये पार पडलेल्या राज्यकार्यकारणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठराव केलेला आहे सरकारकडे मागणी केलेली आहे की, गाईच्या दूधाला सरकारने किमान 7 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करावं. तरच या संकटातून शेतकरी बाहेर पडू शकेल. असे राजू शेट्टी म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा