थोडक्यात
इंदापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील सक्रियपणे प्रचार करत आहेत.
राजवर्धन पाटील गेल्या तीन-चार दिवसांपासून इंदापूर तालुक्यात विविध गावांमध्ये हजारो युवकांसोबत बाईक रॅली काढून प्रचार करत आहेत.
राजवर्धन पाटील यांच्या बाईक रॅलीला युवक वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील यांनी कंबर कसली आहे. राजवर्धन पाटील यांनी आता प्रचारात आघाडी घेतली असून गेली तीन चार दिवस झाले ते इंदापूर तालुक्यात अनेक गावी हजारो युवकांसोबत बाईक रॅली काढून प्रचार करीत आहेत, त्यांच्या या बाईक रॅलीला युवक वर्गात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
नेते येतात नेते जातात मात्र जनता ही आमच्या सोबत आहे. नेते जरी इतर पक्षात गेले तरी काय फरक पडणार नाही, आता जनतेलाच मलिदा गॅंग काय आहे ते कळाले आहे. त्यामुळे कोणी हजार कोटी विकास निधी आणला त्याचे उत्तर मलिदा गॅंग म्हणून जनतेनचं दिला आहे. व येणारा 23 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार असा निर्धार राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.