Rajya Sabha Team Lokshahi
ताज्या बातम्या

Rajya Sabha Election Live : काँग्रेस, राष्ट्रवादीची 11 मते शिवसेना उमेदवारास

राष्ट्रवादीचे काही आमदार नॉट रिचेबल

Team Lokshahi

शिवसेनेच्या नाराजीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने बदलली रणनीती

आपल्या उमेदवारास 44 मतांचा कोटा करण्याचा निर्णयामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती. यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती बदलली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत 42 मते आपल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन रणनीती बदलण्यात येणार आहे. 42 मतांचा कोटा पुर्ण झाल्यास उर्वरित मते शिवसेनेच्या उमेदवारास देण्यात येणार आहे.

11 मते शिवसेना उमेदवारास

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 11 मते शिवसेना उमेदवारास देण्याती आली आहे. दुपारी 2.30 पर्यंत 281 उमेदवारांचे मतदान पुर्ण झाले आहे. संजय पवार यांना 41 मते मिळणार असल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला.

180 आमदारांचे मतदान

राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 180 आमदारांनी मतदान केले आहे. राष्ट्रवादीच्या 48 आमदारांनी मतदान केले असून शिवसेनेच्या आमदारांचे मतदान आता सुरु झाले आहे.

राष्ट्रवादीवर मुख्यमंत्री नाराज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला. 42 ऐवजी कोटा बदलून 44 केला आणि त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवला

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांच्यांसाठी मतदानाचा कोटा वाढवला आहे. यामुळे शिवसेनेसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दुसरा उमेदवार धोक्यात आहे.

काँग्रेसच्या 15 आमदारांचे मतदान

काँग्रेसच्या 15 आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार अजून मतदानास निघाले नाही. भाजपच्या आमदारांनी मतदानास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होत आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून ३, शिवसेनेकडून २ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

शिवसेना उमेदवार धोक्यात

काँग्रेसमुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात आला आहे. काँग्रेसने आपल्या मतांचा कोटा 44 केला आहे. यामुळे शिवसेनेची तीन मते कमी होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली