ताज्या बातम्या

नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या आधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या ठिकाणी ही नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली. 

नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आले असले तरी त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती. ते अजित पवार गटाला साथ देणार असल्याचीही चर्चा होती. पण मलिकांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं