Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला
ताज्या बातम्या

Raksha Bandhan Trafic Jam : रक्षाबंधनाचा आनंद वाहतूक कोंडीत अडकला; लाडकी बहिण-भावाचा सण सिग्नलवर थांबला

रक्षाबंधन वाहतूक कोंडी: ठाणे, मुंब्रा, भिवंडीमध्ये सणाच्या दिवशी वाहनांची लांबलचक रांग.

Published by : Team Lokshahi

रक्षाबंधन हा सण म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचा उत्सव. पण यंदा ठाणे, मुंब्रा, भिवंडी, कल्याण परिसरात वाहतूक कोंडीमुळे अनेक बहिणी व भावांना वेळेवर एकमेकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले. सणासुदीच्या गोड क्षणांची प्रतीक्षा करत निघालेल्या कुटुंबांना ट्रॅफिकच्या लांबलचक रांगांनी अडवून धरले.

विशेषतः मुंब्रा टोल नाका, खारेगाव व भिवंडी मार्गावर गाईमुख-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहन ठप्प झाली. 8 ऑगस्ट मध्यरात्रीपासून 11 ऑगस्ट सकाळी 5 वाजेपर्यंत भारी वाहनांना या मार्गावर बंदी असली तरी, पॅच रिपेअर कामामुळे उर्वरित मार्गावरही कोंडी निर्माण झाली.

सणात काम का? लोकांचा प्रश्न

अनेकांनी सणासुदीच्या काळात रस्त्यांच्या कामांना टाळावे, असे सांगितले. “लोक भावंडांना भेटायला निघतात, अशावेळी अशा कोंडीने सणाची गोडी निघून जाते,” असा नागरिकांचा सूर होता. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण-भावाच्या भेटीतला गोड क्षण लांबलचक वाहनरांगांमध्ये अडकून पडला. सण साजरा झाला, पण काही राख्या वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत, हे मात्र खेदाने सांगावे लागते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : हार्दिक पंड्या ऐवजी शुभमन गिल उपकर्णधार पदाची जबाबदारी? भारतीय T-20 संघात बदलांची चर्चा

Ram Charan New Home : राम चरणच्या हैदराबादमधील आलिशान घराची झलक

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढला; प्रवाशांची वाढ, उत्पन्नात विक्रमी भर

How To Identify Real Gold :सोनं खरे की खोटे? जाणून घ्या ओळखण्याची पद्धत