Happy Raksha Bandhan 2025 Wishes: एकमेकांना शुभेच्छा दिल्याशिवाय कोणताही सण अपूर्ण वाटतो. रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. जर तुम्ही या दिवशी तुमच्या भावंडांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही या सुंदर संदेशांद्वारे तुमच्या भावंडांना शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही त्यांना व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा फेसबुकवरही शेअर करू शकता.
"रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा"
रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती…
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती…
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी……
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!