भूपेश बारंगे|वर्धा: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. या वक्तव्यानंतर राज्यात पडसाद उमटायला लागले. यात आर्वी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी आर्वी ,आष्टी येथे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्यपाल यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आज त्यांनी स्वगृही स्वतःच्या रक्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्यासाठी चक्क स्वतःच्या रक्ताने पत्र लिहलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. राज्यपालांना पदावरून कमी करण्यासाठी राष्ट्रपतीना रक्ताने लिहलेल्या पत्रातून मागणी करण्यात आली.