हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व कमी करण्याचं शिंदेंचा कट असल्याचा आरोप संजय राऊतांचा केला आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपचे नेते राम कदमांनी आपली प्रतिक्रिया लोकशाही मराठीला दिली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे गटाचे जे प्रवक्ते सकाळ, दुपार ,संध्याकाळ त्यांचे वक्तव्य चीड आणणारी, एका वेगळ्या बालकबुद्धीतून निर्माण झालेली वक्तव्य असतात. स्वर्गीय आनंद दीघे साहेबांचं पुर्ण जीवन जर पाहिलं तर त्यागपुर्ण आणि समर्पित असं जीवन हजारो लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. एखाद्या थोर व्यक्तीबद्दल एवढे गलिच्छ विचार असतील. तर या विचारांना उद्धव ठाकरे थांबवत का नाही हा पहिला प्रश्न उपस्थितीत होत आहे. बाळासाहेबांनी सांगितले होते की, माझी शिवसेना कॉंग्रेससोबत कधी जाईल तर, सगळ्यात पाहिल्यांदा शिवसेना नावाचं दुकान बंद करेन हे त्यांचे वक्तव्य होतं. जे लोक स्वत: बाळासाहेबांच राहिले नाही. ते लोक आनंद दिघेना कसे वंदनीय पूजनीय बोलू शकतील. बाळासाहेबांना माणनारे कार्यकर्ते हळूहळू भाजपमध्ये आले किंवा एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले आहेत."