Ram Mandir  
ताज्या बातम्या

अयोध्येतील राम मंदिर परिसरात धक्कादायक घटना! सुरक्षा रक्षकाचा गोळी लागून संशयास्पद मृत्यू

अयोध्येतील राम मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरात असलेल्या व्हीआयपी गेटजवळ तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचा गोळी लागून संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Published by : Naresh Shende

Ram Mandir Security Gaurd Death : अयोध्येतील राम मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरात असलेल्या व्हीआयपी गेटजवळ तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचा गोळी लागून संशयास्पद मृत्यू झाला आहे. परंतु, बुधवारी पहाटे या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याच अचानक गोळी लागली. त्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी या सुरक्षा रक्षकाला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. शत्रुघ्न विश्वकर्मा असं मृताचं नाव असून तो उत्तर प्रदेश येथील आंबडेकरनगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात व्हाआयपी गेटजवळ तैनात असेलेल्या सुरक्षा रक्षकाचा गोळी लागून संशयास्पदरित्या मृत्यू झाला. विश्वकर्माचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. ज्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली, त्या ठिकाणापासून राम मंदिर फक्त १५० मीटर अंतरावर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा