महाराष्ट्र भूषण 2024 शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा केली आहे. तसेच भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना २०२४ चा 'महाराष्ट्र भूषण' हा सन्मान्य पुरस्कार आम्ही जाहीर केल्यानं या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचे अभिनंदन केले.
फडणवीसांकडून विधानसभेत घोषणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्कारात रोख रक्कम 25 लाख रुपये मानपत्र, मानचिन्ह व शाल अशी आहे. दिनांक 12 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कारा करता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे".
फडणवीसांकडून राम सुतार यांचे कौतूक
"राम सुतार यांच वय 100 वर्ष आहे तरी देखील ते शिल्प तयार करत आहेत. विशेषतः चैत्यभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच जे स्मारक तयार होत आहे त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुर्ती देखील तेच तयार करत आहेत", अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.