Ramdas Kadam on Anil Parab : कदमांचा तिसऱ्या दिवशीही हल्लाबोल, परबांवर गंभीर आरोप! Ramdas Kadam on Anil Parab : कदमांचा तिसऱ्या दिवशीही हल्लाबोल, परबांवर गंभीर आरोप!
ताज्या बातम्या

Ramdas Kadam on Anil Parab : रामदास कदमांचा तिसऱ्या दिवशीही हल्लाबोल, अनिल परबांवर केले गंभीर आरोप!

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल पत्रकार परिषद घेत रामदास कदमांच्या प्रत्येक आरोपांवर प्रत्युत्तर दिले. अनिल परब म्हणाले की," हे पूर्णपणे खोटं आहे,

Published by : Riddhi Vanne

शिवसेनेच्या दसऱ्याच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन दिवस त्यांचे शरीर तसंच ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्या हातांचे ठसेही घेतले गेले होते. या आरोपांवर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल पत्रकार परिषद घेत रामदास कदमांच्या प्रत्येक आरोपांवर प्रत्युत्तर दिले. अनिल परब म्हणाले की," हे पूर्णपणे खोटं आहे, कारण बाळासाहेब यांना भेटायला प्रचंड गर्दी होती शवघराशिवाय मृतदेह असा ठेवता येत नाही मेडिकली हे अजिबात शक्य नाही आहे." अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या बुद्धिमत्तेवरही शंका उपस्थित केली.

त्यावर रामदास कदमांनी अनिल परबानी इशारा दिला. त्यांनी म्हटलं की, अनिल परबनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर नीच शब्दांत टीका केली, जी त्यांनी पाहिली नव्हती. त्यांनी पुढे सांगितलं की, बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत ठेवण्यात आला होता, ज्याबद्दल उद्धव ठाकरे बोलायला हवे होते, पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. रामदास कदमांनी याच कारणांमुळे पक्ष फूटला असल्याचा आरोपही केला आणि कोर्टात जाण्याचा इशारा दिला.

रामदास कदम पुढे म्हणाले की, विलेपार्लेच्या प्रेमनगर भागातील SRA योजनेत अनिल परब यांनी हजारो मराठी लोकांची घरं खाली करून फक्त एक वर्ष भाडे दिलं. त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले असून बिल्डरकडून दोन गाड्या घेतल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तसेच, मातोश्रीत डॉक्टरांची टीम असल्याचा दावा अनिल परब यांनी केला होता, पण तो खोटा असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं. त्यांनी विचारलं की, डॉक्टरांचे नाव का नाही सांगितले? अनिल परब का बोलत नाहीत, तर उद्धव ठाकरे का नाही बोलत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शेवटी, रामदास कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांच्या बोगस कंपन्यांबाबत त्यांच्याकडे यादी आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहेत, असं त्यांनी इशारा दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा