Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : काल नेस्कोमधील शिवसेना शिंदेचा गटाचा दसरा मेळावा साजरा करण्यात आला. यामध्ये शिवसेना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दलचे धक्कादायक खुलासा करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके उपयोग कशासाठी केला त्याबद्दलचा खळबळजनक दावा सामदास कदमांनी केला. यानंतर पुन्हा माध्यमांशी संवाद साधत रामदास कदमांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत पुन्हा नवीन आव्हान दिले आहे.
रामदास कदम म्हणाले की, "दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चाप ओढायचा उध्दव जी यांचा स्वभाव, ते दिसतात तसे नाही ते कपटी आहेत. आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा. शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा त्यांनी छळ केला. ते पुन्हा मी आता जवळने बोलतोय. मी उद्धव ठाकरेंना म्हटलं त्यांच्या पायाचे ठसे घ्या.. ते म्हणाले मी त्याच्या हातांच्या ठसे घेतले आहे.. मग ते का घेतलं? त्या हाताच्या ठशाचा उपयोग कशासाठी केला. रामदास कदमांचा गंभीर आरोप. मी उशिराने बोललो आणि मी काल ओघाने बोलत गेलो. वाघाच्या कायद्याचा मुखवटा घातला ते वाघ नाही लांडगे उद्धव ठाकरे आहेत. ज्या दिवशी मी बोलेन त्यादिवशी मातोश्रीला कापरे भरतील. माझ्या नादाला लागू नका. माझी पाठ अनेकदा बाळासाहेब यांनी थोपटली होती. बाळासाहेबांसोबत त्या दोन दिवसांमध्ये घडलेली गोष्ट अतिशय गंभीर आहे. शरद पवार आले होते त्यांनाही वर पाठवले नाही. मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देत आहे उद्धव... असे शरद पवार यांचे वाक्य होते. अनेक गोष्टी आहेत बोलणार पण नाही, बाळासाहेब काय काय बोलले होते ते माझ्या आत छातीत आहे. उगाच बोलायला भाग पाडू नका. तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते की नाही? मी खोट पाप करणार नाही. उध्दव काय आहे ते महाराष्ट्राला कळेल. या समोर बोला मग मी पण बोलतो."
कोण भास्कर जाधव?
"कोण भास्कर जाधव? त्याला मी आणलं पक्षात.. त्याला कोणी तिकीट दिली. तो नंतर बाळासाहेबांच्या पाठी खंजीर खुपसून शरद पवार यांच्याकडे गेला. नंतर उध्दवकडे परत आला. हा तर गद्दाराचा बाप आहे, हा काय माझ्याबद्दल बोलणार यांची औकात काय? हे गद्दार माझ्यावरती काय बोलू शकतात."