ताज्या बातम्या

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; मराठीतून घेतली शपथ

Published by : Siddhi Naringrekar

नवनियुक्त राज्यपाल बैस यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा 12 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. यापूर्वी रमेश बैस झारखंडचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर बैस हे शुक्रवारी प्रथमच मुंबईत आलेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी बैस यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले 'झारखंड वित्त विधेयक-2022 ' दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदाही त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

रमेश बैस हे राज्याचे 14वे राज्यपाल म्हणून नियुक्त होणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस हे तब्बल सात वेळा खासदार राहिले आहेत. बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये सर्वात आधी नगरपालिकेत निवडून गेले होते. यानंतर 1980 ते 1984 मध्ये आमदार म्हणून मध्यप्रदेश विधानसभेत ते निवडून गेले होते. त्यानंतर रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. सोबतच त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यानंतर रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. यासोबतच ते मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष देखील होते.

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा