Ujjwal Nikam Team Lokshahi
ताज्या बातम्या

राजद्रोहाच्या कलमाबाबत काय म्हणतात, विशेष सरकारी वकील

एखादे भाषण, लिखाण किंवा कृतीद्वारे सरकारची बदनामी केली तर लावले जाते हे कलम

Published by : Team Lokshahi

प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Navneet Rana and MLA Ravi Rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी आपले मत मांडले.

काय आहे कलम

एखादे भाषण, लिखाण किंवा कृतीद्वारे सरकारची बदनामी केली तर ती दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी तयार केलेले राजद्रोहाचे कलम आजही आहे. भारतीय राज्य घटनेत तर प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे या कलमात आता सुधारणा झाली पाहिजे, असं मत अनेकांनी नोंदवले आहे.

उज्ज्वल निकम म्हणतात?

राजद्रोहाच्या कलमावर उज्ज्वल निकम म्हणाले, राजद्रोहाचे कलम कलम ब्रिटिशांनी इंडियन पिनल कोड केलं तेव्हापासून आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी अमानूष पद्धतीने या कलमाचा वापर झाला. सातत्याने तेव्हापासून या कलमात सुधारणाची मागणी होत आहे. 124 (अ) असं हे कलम असून यात कुणाचं भाषण किंवा लेखन स्वातंत्र्यामुळे सरकारची बदनामी झाली तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला जातो. घटनेने बोलण्याचा आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकांना दिलं आहे. परंतु या कलमामुळे त्यावर मर्यादा येतात. सर्वोच्च न्यायालयासमोर हा प्रश्न प्रलंबित आहे. माझ्या मते, राजद्रोहाच्या कलमात संशोधन होणं आवश्यक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा