बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर लवकरच हॉलीवूडच्या चित्रपटात पदार्पण करणार असल्याची चर्चा मनोरंजन क्षेत्रात रंगली आहे. रणबीर कपूर आगामी जेम्स बाँड चित्रपटात काम करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलीवूडचे दिग्गज मायकेल बे करणार आहेत. त्यांनी बे ट्रान्सफॉर्मर्स आणि बॅड बॉईज फ्रँचायझीसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रणबीर कपूर आणि आगामी बाँड चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. हा चित्रपट जून २०२५ मध्ये नवीन कलाकारांसह प्रदर्शित होणार अलून रणबीर कपूर यात प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे समजते. मात्र रणबीर कपूर किंवा मायकेल बे यांनी अद्याप या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली असून या वृत्तांचे खंडनही केलेले नाही.
अभिनेता रणबीर कपूरने दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या सावरया चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर रॉकस्टार, राजनिती, बर्फी, अॅनिमलसारख्या चित्रपटातून त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. आपल्या चार्मिंक लुक आणि सीक्स पॅक अॅब्ससोबत रणबीर कपूर अनेकांचा फेव्हरेट बनला आहे. हिंदी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर आता तो हॉलीवूडमध्येही आपली भूरळ घालणार का, हे पाहण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे.