ताज्या बातम्या

फोन टॅपिंग प्रकरणी आरोपमुक्तीसाठी रश्मी शुक्ला यांचा अर्ज

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.

याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर 4 मार्च रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोपा प्रकरणी फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे आपल्याला या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोपाप्रकरणी फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आपल्याला या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, अशी मागणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या अर्जावर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा