राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाबाबत विधान केलं आहे. यावेळी त्यांनी समाजाच्या एकतेवर भर दिला आहे. भारताची एकताच हिंदूंची सुरक्षा करू शकते. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी तळागाळापर्यंत जोडलेले आहेत. जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल तेव्हाच भारताला वैभव प्राप्त होईल, असं मत त्यांनी मांडलं आहे. आरएसएसच्या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. शेजारील देशांमध्ये हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांनी बाळगलेलं मौन यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ‘जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.