ताज्या बातम्या

Ratnagiri Crime News : गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, 6 महिन्याचं अर्भक दगावलं

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील एका गर्भवती महिलेला (pregnant woman) नातेवाईकांकडून सातत्याने त्रास दिला जात होता.

Published by : Team Lokshahi

निसार शेख | रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील एका गर्भवती महिलेला (pregnant woman) नातेवाईकांकडून सातत्याने त्रास दिला जात होता. याबाबत गर्भवती महिला मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली असता, नातेवाईकांनी पोलिसांसमोर गर्भवती महिलेला मारहाण केली. पोलिसांसमोरच हा सगळा संतापजनक व धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मंडणगड पोलीस (Mandangad Police) स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, मरियम डावरे वय वर्ष ३४, राहणार नवानगर म्हाप्रळ मोहल्ला यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. काल (1 ऑगस्ट ) ला फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीमध्ये डावरे यांनी म्हटले आहे की, म्हाप्रळ येथील फुरकान मुकादम, त्याची आई नाव माहित नाही,जहूर मुकादम, हसमत काजी, फैजान मुकादम, अब्बास मुकादम या सहा जणांनी दिनांक २३ जुलै २०२२ रोजी म्हाप्रळ येथे त्यांना मारहाण केली.

या वेळेला मर्यम यांच्या पोटावर देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सहा महिन्याच्या गर्भवती असल्याने त्यांना त्याचा त्रास होऊ लागला. अशात खेड कळंबणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे सहा महिन्याचे बाळ दगावले आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात संबंधिताविरोधात भादवी कलम १४१, १४३, १४९, ३१५, ३१६, ५०४, ५०६, ३५४( ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलाजा सावंत करीत आहेत. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी लक्ष घालावे व संबंधीत संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा