रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. रवी राणा म्हणाले की, आधीसुद्धा संजय राऊत अंधारामध्ये होते, आतासुद्धा ते अंधारामध्ये आहेत. उद्धव ठाकरेंची छुपी रणनिती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद करुन सुरु आहे.
येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्विकारलेलं आहे.
यासोबतच ते म्हणाले की, येणाऱ्या काळातसुद्धा मोदीजींचेसुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्विकारणार आहेत. त्यांचे पाऊल टाकणं सुरु आहे. म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की, उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसतील. असे रवी राणा म्हणाले.